काय सांगता: नेप्ती उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या कांद्याची चोरी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेप्ती उपबाजार समितीमध्ये सभासदांकडून लुटमार होत असून ही कांद्याची लुटमार थांबविण्यात यावी. अशा मागणी अहमदनगर ओनियन मर्चंट असोसिएशनच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना केली आहे.

नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये अहमदनगर माथार्डी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम करत आहेत.

मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने शेतकरी मालाचा लिलाव झाल्यानंतर लिलावासाठी सोडण्यात आलेल्या कांद्याच्या गोण्या भरण्याचे काम महिला करतात. म

हिला कामावर येताना पिशव्या घेवून येतात व जाताना पिशव्यांत कांदा भरुन नेतात. खरेदीदारांनी खरेदी केलेल्या कांद्याची सभासदांकडून मोठ्या प्रमाणात लुटमार होत आहे. याबाबत वेळोवेळी बाजार सतिमीचे लक्ष वेधले परंतु, यात बदल झाला नाही.

महिलांनी येताना गेटवरच पिशव्या जमा करणे बंधनकारक करावे, त्यामुळे कांदा चोरीला आळा बसेल. गेटवर पिशव्या न ठेवल्यास त्या महिलांना प्रवेश देवू नये. महिलांचे काम दुपारी दोन वाजेपर्यंत संपत असतांना संध्याकाळी सातपर्यंत महिला बाजार समितीच्या आवारात असतात.

या प्रकारामुळे कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याची लुटमार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

अशी मागणी अहमदनगर ओनीयन मर्चंट असोसिएशनच्यावतीने बाजार समिती सभापतींना दिलेल्या निवेदनात केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24