अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- ऑलम्पिक स्पर्धेत नीरजा चोप्राने भालाफेक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या विजयानंतर देशाची मान उंचावली आहे, यामुळे देशभरातून नीरजचे कौतुक होत आहे.
यातच नीरज प्रमाणे भालाफेकीचा मोह बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला आवरला नाही. मात्र तिच्या भालाफेकीमुळे एक वेगाचं गोंधळ निर्माण झाला. नीरजची कॉपी करत राखी सावंत मुंबईच्या रस्त्यावर एक काठी घेऊन भालाफेकीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. राखीने काठी फेकल्यानंतर तिचा नेम चुकला आहे.
समोरून ‘हे काय चाललं आहे’ असा आवाज येतो आहे. राखीने फेकलेली ही काठी एका व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. राखीने भालाफेक सरावाच्या नादात एकाचं डोकं फोडलं.
म्हणजे तसं त्या व्यक्तीला फार लागलं असं नाही तर हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. राखी यात ‘मी प्रयत्न तर केला,’ असं उत्तर देतानाही दिसते आहे. काठी फेकल्यानंतर ती स्वतःचंच कौतुक करते.
दरम्यान राखी सावंत कायमच चर्चेत असते. बिग बॉस 14 नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत आहे. राखी जीममध्ये जाऊ दे किंवा फळं-भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडू दे,
तिच्याभोवती फोटोग्राफर्स मंडळींचा गराडा पाहायला मिळतो. अशा वेळी राखी अशी काही विचित्र कृती करते, की त्यामुळे फोटोग्राफर्स, तसंच आजूबाजूच्या लोकांचंही चांगलंच मनोरंजन होतं.