ताज्या बातम्या

काय सांगता: रुसलेले कावळे तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा परतले अन सुरू झाला ‘काकस्पर्श’…!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- आपल्या संस्कृतीत एकदा व्यक्ती मृत झाल्यानंतर दशक्रियाविधीच्या दिवशी काकस्पर्शाची एक परंपरा आहे. मात्र राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रूक येथील दशक्रियाविधीच्या घाटावर वीजवाहक तारांना चिकटून एक कावळा मृत्युमुखी पडल्यानंतर चक्क कावळ्यांनी याठिकाणी येणे बंद केले होते.

परंतु तब्बल तीन वर्षांनंतर याठिकाणी पुन्हा कावळे जमा व्हायला लागल्याने काकस्पर्शाची अडचण दूर झाली आहे. नांदुर्खी बुद्रुक येथील गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला दशक्रिया विधी घाटावर या परिसरातील दशक्रिया विधी होतात.

मागील तीन ते चार वर्षांपूर्वी पिंडदानादरम्यान एका कावळ्याचा वीजवाहक तारांना चिकटून मृत्यू झाल्याने कावळ्यांनी या ठिकाणी येणे बंद केले होते.

त्यामुळे काकस्पर्श न होणे ही मयतांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने एक गंभीर समस्या बनली होती. काकस्पर्श होत नसल्याने पिंडदान केले जात होते.

मात्र यामध्ये शोकाकूल कुटुंब व नातेवाईक यांची मोठी धावपळ होते होती. परंतु तीन वर्षांपासून न भिरकणारे कावळे याठिकाणी पुन्हा जमून काकस्पर्श करू लागल्याने या परिसरातील इतर ठिकाणी दशक्रिया विधीला जाणे टळले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office