काय सांगता : या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण मारतात शहारात फेरफटका!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-सध्या नुसतं कोरोनाचे नाव जरी घेतले तरी मनात प्रचंड भीती वाटते. परंतु कोरोनाबाधित असलेले अन उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले अनेक रुग्ण चौकात फेरफटका मारत असल्याचा प्रकार पाथर्डी येथे घडला आहे.

याबाबत सविस्तर असे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले एक कोरोनाबाधीत ज्येष्ठ नागरीक शहरातील अंजठा चौकातील एका चहाच्या हाँटेलमधे चहा पिण्यासाठी आले होते.

येथे जमलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर ‘मला कोरोना झालेला आहे’ असे ‘त्या’ज्येष्ठ नागरीकाने सांगितले.

त्यानंतर सदरची चित्रफित सोशलमिडीयावर व्हायरल झाल्यावर प्रांतअधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसिलदार शाम  वाडकर व पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांना संबधीत प्रकाराची चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले.

या उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरचा कारभार रामभरोसे सुरु आहे. येथील अनेक कोरोनाबाधीत रुग्ण हे चक्क शहरात फिरुन येतात. काहीजण जेवनासाठी बाहेर जातात.

काल हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनातील अधिकारी मात्र आवाक झाले. प्रांतअधिकारी देवदत्त केकाण यांनी तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना याबाबत सुचना दिल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24