काय सांगता! तिन मजली महामार्ग आणि तो देखील नगरमध्ये?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे,मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, विविध व्यावसायिकांनी रस्त्यावरच केलेली अतिक्रमणे यामुळे वाहनचालक व पायी जाणारे यांच्या दोघांच्याही जीवाला कायम लागलेला घोर असे चित्र सध्या नगर येथील महामार्गावर दिसत आहे.

परंतु आता हे चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर पुणे महार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा महामार्ग तब्बल तिनमजली होणार असल्याची माहिती दिली आहे.

नगर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असून नगरपासून पुणे अवघ्या १२० किमी अंतरावर आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यातील अनेक तास तर त्यांना वाहतूक कोंडीचाच सामना करावा लागतो. परंतु आता नवीन महामार्गामुळे हा प्रश्न कायमचाच निकाली लागणार आहे.

या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी भूसंपादनासह इतर काही तांत्रीक अडचणी येतात त्यामुळे रुंदीकरणाऐवजी हा महामार्गच तिन मजली करण्याचे निश्चीत करण्यात आले आहे.

या कामासाठी सुमारे ६ हजार कोटी रूपयांचा खर्च येणार असून सहा महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे नाग़डकरी म्हणाले. तसेच अशा स्वरूपाचा हा देशातील पहिलाच बहुमजली महामार्ग ठरेल असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24