अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-देशाताल कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.
वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही.
मात्र, लस घेतल्याने कोरोना व्हायची शक्यता असते. मात्र, त्याची तीव्रता कमी होते. साध्या उपचारांनी कोरोना बरा होतो आणि तुम्ही लवकर बरे होऊन घरी परतू शकता.
लस घेतल्यानंतर शरिरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम लस करते.
बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरुपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता उभारते, आता या अँटीबॉडीज कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात.
रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते. लसीकरणाबाबत सरकारनं केलेल्या घोषणेनंतर आता 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात.
सध्या देशात 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारनं सोमवारीच व्हॅक्सिनच्या पुढील टप्प्याबाबतची घोषणा केली.
यामध्ये 1 मेपासून `18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली. कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत असल्यानं तरुणांना लस देण्याची मागणीही वाढत होती, याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली.