अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला.
अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. राज्यसरकारनेही अलीकडेच लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय..
पण त्यातच काही दिवसांपूर्वी बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. सध्या भारतात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम मुलांवर दिसून येईल. आकडेवारी याची पुष्टी करते. दरम्यान, मुंबईत एका आठवड्यात सुमारे 40 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी आहे.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडक देत आहे. यावेळी कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम मुलांवर आणि तरुणांवर दिसून येत आहे. मानखुर्द येथील चेंबूर चिल्ड्रन होममध्ये 10 ते 18 वर्षे वयोगटातील 18 मुलांना कोरोनाची लागण झाली. येथे एकूण 102 मुले राहतात.
मुंबईतील कोविडच्या पहिल्या लाटेत एकूण रुग्णांपैकी 5.6% मुले आणि 19 वर्षांखालील मुले होती. सध्या, हा दर जवळजवळ दुप्पट झाला आहे म्हणजेच 10.8% मुले आणि तरुण मुंबईत संक्रमित आहेत. जूनमध्ये 13% मुले आणि तरुण कोविडने प्रभावित झाले.
एकीकडे अनलॉक आणि दुसरीकडे सणासुदीच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती प्रत्येकाला सतावत आहे. या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान मुंबईत 19 वर्षांखालील 247 मुले आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
यापैकी 65 मुले 9 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. त्याच वेळी, ऑगस्टच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची 8041 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 508 म्हणजेच 9.2% मुले कोरोना पॉझिटिव्ह होती. जनगणनेनुसार, मुंबईची 29% लोकसंख्या 19 वर्षांखालील वयोगटातील आहे आणि यावेळी या वयोगटात कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. अशात तिसरी लाट आल्यास, ही लाट सर्वाधिक घातक लहान मुलांसाठीच ठरेल. अशात आता लहान मुलांनाही लवकरात लवकर लस देण्याची गरज आहे.