ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं?” भाजप नेत्याने पवारांना डिवचले

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात चांगलाच तापला आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला विरोधी पक्षांनी घेरले आहे. मात्र भाजप नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारला ४८ तासांचे अल्टिमेटम दिले होते. अन्यथा ते बेळगावमध्ये जाणार असल्याचे म्हंटले होते. मात्र आज भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना यावरूनच डिवचल्याचे दिसत आहे.

मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय आणि महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले ४८ तासांत थांबले नाहीत तर मी स्वतः बेळगावमध्ये जाईल असा इशारा शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला होता.

निलेश राणे एक ट्विट करत शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं? असा सवाल केला आहे.

निलेश राणे यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री दिवसेंदिवस सीमावादावरून चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याने हा वाद आणखी चिघळणार का? असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता केंद्र सरकारकडे जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार सोबत केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office