अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- जन्मला त्याला मृत्यू येणार हे अटळ सत्य आहे. जीवनावर कितीही प्रेम असले, दीर्घायुष्याची कितीही इच्छा असली, तरी वेळ झाली की मृत्यू आपल्याला गाटतोच.
व्यक्ती मरण पावल्यावर तिच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात आणि त्यातील काही स्पष्ट दिसतात. मृताच्या शरीरात होणारे बदल सर्वसाधारणपणे सारखे असतात. व्यक्तीचे निधन झाल्यावर मागे उरते शरीर. निधनानंतर शरीरात काही बदल होऊ लागतात आणि ते दिसतातसुद्धा .
शरीरांतर्गत अवयवांचे कार्य आता कायमचे थांबलेले असते. यात बदल होतात ते पाहा. हृदय :- व्यक्ती जीवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रथम हृदयाचे ठोके तपासले जातात. हृदयाचे कार्य थांबले की त्याचे रक्त पंपिंग करणे बंद होते आणि हे रक्त रक्तवाहिन्या, तसेच शिरांमध्ये साठते.
शरीराचा रंग :- निधनानंतर हृदयाचे रक्ताभिसरणाचे काम थांबते आणि शरीरावरील काही भाग जखम झाल्याप्रमाणे, तर काही भाग फिकट रंगाचे दिसायला लागतात. रक्तप्रवाह पूर्णपणे थांबलेले भाग फिकट दिसतात. शरीराचे तापमान घटणे :- मृत्यूनंतर शरीराचे तापमान घटायला लागून ते थंड होऊ लागणे म्हणजे ‘अल्गोर मॉर्टिस.’ मृत्यूनंतर मानवी शरीराचे तापमान दर तासाला सुमारे एक अंशाने कमी होत जाते.
शरीर ताठर होणे :- निधनानंतर शरीर ताठर होऊ लागल्यास ‘रिगर मॉर्टिस’ म्हणतात. ‘ अँडनोसाइन ट्रिफोस्पिअर’ची (एडीटी) पातळी घटल्यामुळे असे होऊ लागते. डोळ्यांच्या पापण्या आणि मानेचे स्नायू प्रथम ताठर होतात.
हिसका बसणे :- मृतदेहाकडे बघताना त्याला काही वेळा हिसका बसत असल्याचे दिसते. मृत्यूनंतरही शरीर काही हालचाली करते. त्याचे कारण आहे, स्नायूंचे आकुंचन. काही स्नायू एकाच वेळी आकुंचन पावत असताना शरीराला हिसका बसतो.
चेहरा सपाट होणे :- व्यक्ती मरण पावल्यावर तिच्या चेहऱ्याचे स्नायू शिथिल होत असल्यामुळे संपूर्ण चेहरा सपाट झाल्यासारखा दिसतो.
दुर्गंध :- मृतदेहाचा वास कधीच चांगला नसतो. त्याचे कारण म्हणजे, शरीरातील मृत पेशी उत्सर्जित करत असलेली विकरे. ही व्यक्ती मरण पावल्याचा शरीरातील जीवाणूंना दिलेली ही सूचना असते. त्यामुळे शरीरातील जीवाणू आणि बुरशी मृत पेशी खायला प्रारंभ करतात. शरीर कुजायला लागण्याच्या प्रक्रियेची ही सुरुवात असते.
त्वचा सैल पडणे :- मृत्यूनंतर हाडे आणि स्नायुंभोवती असलेली त्वचा बाजूला होऊ लागल्यामुळे संपूर्ण शरीराभोवती असलेली त्वचा सैल पडते.
हाडे कुजणे :- व्यक्ती मरण पावल्यावर सर्वांत शेवटी हाडे कुजतात किंवा नष्ट होतात. ती संपूर्ण नष्ट होण्यास काही दशके लागू शकतात.