ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय…गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. येरवडा परिसरातील कोतेवस्ती येथे रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.(Attack on the police)

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी यावेळी परिस्थिती लक्षात घेता स्वत:च्या रक्षणार्थ हवेत गोळीबार केला.

मात्र यावेळी जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्वधर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. शक्‍ती सिंह नावाचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी साथीदारांच्या मदतीने या परिसरातील नागरिकांना त्रास देत होता.

नागरिकांची ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक शक्‍ती सिंह याला पकडायला गेले. पोलीस ताब्यात घेण्यासाठी आल्याचं लक्षात येताच शक्ती सिंह याने समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले.

त्यानंतर तेथील नागरिक पोलिसांवर चालून आले. त्यामुळे पोलिसांनी स्वरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि शक्‍ती सिंह याला पोलिासांनी ताब्यात घेतले.

Ahmednagarlive24 Office