अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील प्रसिद्ध असलेली शिरेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी रविवारी रात्री अंदाजे 1 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीन कडून पेटवण्याचा प्रयत्न झाला.
सोनई शिरेगाव रोड लगत सेवा सोसायटीची प्रशस्त इमारत आहे.रोड लगत असणाऱ्या लाकडी खिडकीतुन गोल छिद्र पाडून आतील बाजूची स्लाडिंगची काच फोडुन एका लांब तारेला सुतळी धागे गुंडाळून त्या वर पेट्रोल टाकून आतील बाजूस असणारे काऊंडर वरील कॅम्पुटर,की बोर्ड,सिपीयू, तसेच सेवा संस्थेच्या अतिमहत्वाच्या फाईल फेटवण्याचा उद्देश होता.
परंतु हा पर्यत फसला. त्यानंतर रविवारी सकाळी संचालक मंडळाच्या बोर्ड मीटिंगची नियोजन करण्यासाठी कर्मचारी यांनी सोसायटीचे मुख्यदार उघडले असता त्यानंतर त्यांना झालेला प्रकार लक्षात आला.
त्यानंतर सकाळी सोनई पोलीस स्टेशनचे इनचार्ज पीआय करपे साहेब व पोलिस हेड कॉन्स्टेबल थोरात साहेब,पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघमोडे साहेब,पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ झाबरे साहेब व टीम यांनी सकाळी समक्ष त्या जागेची पाहणी करून पंचनामा करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ रमेश जाधव,व्हॉ चेअरमन संजय तुवर,कामगार पोलीस पाटील चंद्रकांत होन,तंटामुक्ती अध्यक्ष काकासाहेब जाधव, सचिव जंगले भाऊसाहेब, संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.
झालेल्या प्रकार बद्द्ल शिरेगाव परिसरातील सभासद व ग्रामस्थ यांनी या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या कामधेनु असणाऱ्या संस्थेवर आशा पध्दतीने विकृत हल्ले होत असतील तर ही निंदनीय बाब आहे.