ताज्या बातम्या

Sensex : काय आहे सेन्सेक्स? गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Sensex : सेन्सेक्सने 51,000 ची पातळी ओलांडली, सेन्सेक्स इतक्या इतक्या अंकांनी घसरला अशा बातम्या आपण अनेकदा ऐकत असतो, पाहत असतो. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला सेन्सेक्स म्हणजे काय ते माहित असते.

परंतु, ज्या व्यक्तीचा शेअर मार्केटशी कधी संबंध आला नाही त्या व्यक्तीला सेन्सेक्सबद्दल काहीच माहित नसते. जर तुम्हालाही सेन्सेक्सबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या.

काय असतो सेन्सेक्स?

  • सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे.
  • या निर्देशांकात मार्केट कॅपच्या आधारावर देशातील 13 विविध क्षेत्रातील टॉप 30 कंपन्यांचा समावेश असतो.
  • यामध्ये TCS, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

  • सेन्सेक्स निर्देशांकात एकूण 30 कंपन्यांचा समावेश आहे.
  • त्यामुळे सेन्सेक्स निर्देशांक BSE30 म्हणून ओळखला जातो.
  • हा निर्देशांक 1 जानेवारी 1986 रोजी सुरू झाला आहे.

असे चालते काम 

  • सेन्सेक्स निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांच्या उच्च किंवा कमी शेअर दरांवरून सेन्सेक्समधील चढ आणि उतार मोजता येतात.
  • सेन्सेक्सचे पूर्ण रूप स्टॉक एक्सचेंज सेन्सिटिव्ह इंडेक्स असे आहे.

  • जेव्हा जेव्हा सेन्सेक्सचा आलेख वाढत जातो तेव्हा तेव्हा हे दर्शवते की देशातील विविध क्षेत्रातील कंपन्या चांगले काम करत आहेत.
  • त्यामुळे देशात रोजगाराच्या संधीही वाढतात. उत्पादन आणि सेवांमध्येही वाढ होते.
Ahmednagarlive24 Office