Shahjibapu Patil : काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजीबापू पाटलांच्या डायलॉगची भुरळ

Shahjibapu Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तातरांचे नाट्य घडले. यामध्ये शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र या सत्तांतराच्या काळात शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच फेमस झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगने अख्या महाराष्ट्राला भुरळ पाडली होती. शिंदे गटातील आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुन्हा गुवाहाटीला गेले आहेत.

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे आणि आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देखील दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

Advertisement

शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनाही पडली आहे. गुवाहाटीमध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शहाजीबापू पाटील यांना डायलॉग म्हणायला लावला होता.

शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा डायलॉग खूपच फेमस झाला होता. हाच डायलॉग आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांना म्हणायला लावला.

Advertisement