बाजारातील चढउतारा मध्ये काय आहे सोन्या- चांदीचे दर ? जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

आज, १७ मार्च २०२१ रोजी दिल्ली बुलियन बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम फक्त ६० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या भावातही आज वाढ झाली आहे.

गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४४,४५९ रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रतिकिलो ६६,७३६ रुपयांवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमती खाली आल्या परंतु चांदीचे दर अजूनही कायम आहेत. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की,

जागतिक बाजारात आणि वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचे दर गेल्या तीन दिवसापासून वाढत आहेत.

सोन्याच्या किंमती :- दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति १० ग्रॅमच्या तुलनेत ६० रुपयांची किरकोळ वाढ झाली. राजधानी दिल्ली येथे ९९.९ ग्रॅम शुद्ध सोन्याचे नवीन भाव आता प्रति १० ग्रॅम ४४,५१९ रुपये झाले.

चांदीच्या किंमती :- दिल्ली बुलियन मार्केटमध्ये या पांढऱ्या मौल्यवान धातूची किंमत आता २०० रुपयांनी घसरून ६६,५३६ रुपयांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 26 डॉलर होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24