अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा सगळं पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा किती धोका आहे? यावर बोलताना ज्यावेळी हा विषाणू रुप बदलतो, त्यावेळी त्याला आधीच्या रुपातल्या विषाणूची काही वेळा गरज लागते.
त्यामुळे तो अधिक काळ जिवंत राहू शकतो. जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या अधिक असते, त्यावेळी विषाणूला रुप बदलायला, जिवंत राहायला अधिक वाव मिळत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यालाही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं.
कोरोनाच्या ह्या लाटांना आपणच आपल्या निष्काळजीपणामुळे आमंत्रण दिलं असल्याचंही अग्रवाल म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे डेल्टा प्लसमुळे राज्यात जर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊन धडकली तर साधारण 50 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो.