अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.
जाणून घ्या पुण्यातील परिस्थिती :- पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जाणून घ्या पनवेलमधील परिस्थिती :- कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील.
जाणून घ्या परभणीतील परिस्थिती :- परभणी जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
जाणून घ्या नागपुरातील परिस्थिती नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात असणार आहे. जाणून
घ्या कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती :- कल्याण-डोंबिवली परिसरातील दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार P-1 आणि P-2 यानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येतील. खाद्यपदार्थ आणि शीतपेयाच्या गाड्या रात्री 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनं सुरु राहील.
जाणून घ्या जळगावातील परिस्थिती :- जळगावात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सोमवारी 15 मार्चपासून सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.
जाणून घ्या अकोल्यातील परिस्थिती :- अकोला जिल्ह्यात आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवारी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. शुक्रवार आज रात्री 8 ते सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जाणून घ्या वाशिममधील परिस्थिती :- वाशिम जिल्ह्यात 8 मार्च ते 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यानुसार संध्याकाळी 5 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू आहे.
जाणून घ्या नांदेडमधील परिस्थिती :- नांदेमध्ये12 मार्च रात्री 12 वाजल्यापासून ते 21 मार्च पर्यंत जिल्ह्यात रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व व्यवहार, दुकाने बंद राहतील. औषधी दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. सर्व कोचिंग क्लासेस ,आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
जाणून घ्या औरंगाबादची परिस्थिती :- औरंगाबादेत मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बाजारपेठा सुरु राहणार आहेत. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.