हे काय?? पाण्याच्या बाटलीमुळे ते दोघेजण गेले तुरुंगात!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  सध्या जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. यात अनेक घटना तर भरदुपारी घडत आहेत. दिवसाढवळ्या घरात घुसून मौल्यवान वस्तू लंपास केल्या जात आहेत. या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत.

मात्र मंगळवारी सकाळी कर्जत तालुक्यातील मिरजगावात डॉक्टरच्या घरात घुसलेल्या दोन चोरट्यांना मात्र एका पाण्याच्या बाटलीमुळे तुरूंगाची हवा खावी लागली आहे. याबाबत सविस्तर असे की,

मंगळवारी सकाळी येथील डॉ.संजयकुमार कोल्हे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात तिघांनी घरामध्ये प्रवेश केला. परंतु घराजवळच असलेल्या आपल्या दवाखान्यातून डॉ.कोल्हे पाण्याची बाटली घेण्यास घराकडे आले असता,

घरात कोणी तरी अज्ञात व्यक्ती घुसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र यावेळी चोरट्यांना त्यांची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढला. परंतु ग्रामस्थांनी  त्यांचा पाठलाग करून दोघेजन पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

गावच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ.कोल्हे यांच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्यांकडे दुचाकीवाहन असून ते ताब्यात घेतले आहे. कर्जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाणात घट झाली होती.

मात्र भरदिवसा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. दरम्यान चोरट्यांनी डॉक्टरांच्या घरातून किती ऐवज लांबवला याबाबत तपास केला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24