आता काय करावं ? पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अमेरिकेतल्या इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाल्यानंतर इंधनाचे मासिक आणि तिमाही भाव बुधवारी वाढले आहेत.

OPEC या इंधन निर्यातदारांच्या संघटनेच्या सांगण्यानुसार या वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्येही इंधनपुरवठा कमी करण्याचे सूतोवाच आहे. ऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला.

त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर आहे. कारखान्यांमध्ये कमी असलेला

साठा आणि OPEC राष्ट्रांची उद्या होणारी बैठक याचा विचार करता इंधनाचे भाव उद्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुरवठ्यापेक्षा मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे

अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४९ सेंट्सनं किंवा ०.७ टक्क्यांनी वाढून ७३.४७ डॉलर्स इतका झाला आहे.

हे दोन्हीही निर्देशांक २०१८ मधल्या सर्वाधिक दराच्या अगदी जवळ आहेत. गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या दरामध्ये जून महिन्यात १० टक्क्यांनी वाढ झाली

तर ब्रेंटच्या दरांमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली. रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे समोर आलं आहे की ब्रेंटचा या वर्षातला सरासरी भाव ६७.४८ डॉलर्स प्रति बॅरल इतका राहील तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा सरासरी भाव ६४.५४ डॉलर्स राहील.

हे दोन्हीही दर मे महिन्यातल्या सर्वेक्षणापेक्षा वाढलेले दिसतात. वाढत्या मागणीमुळे तेल उत्पादकांनी पुरवठा वाढवला असला तरी अमेरिकेतील इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाली असल्याचं समोर येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24