अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देशात ओमिक्रॉनचा (Omicron Death in Rajasthan) प्रभाव वाढत असताना आता हाती आलेल्या बातमीनुसार राजस्थानमध्ये एकाच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या वृद्धांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते त्यामुळे हि धक्कादायक बातमी आहे. मृत्यू झालेले व्यक्ती हि वृद्ध होती.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय ७५ आहे.त्या व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असताना , कोरोना रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आले होते. त्यांच्यावर उदयपूरच्या महाराणा भूपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा एक दिवस आधीच रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
कोरोना टेस्ट निगेटिव्ह तरीसुद्धा ओमिक्रोन हे कस काय ?
महाराष्ट्रात काय परिस्तिती
पिंपरीचिंचवडमध्येही एकाचा ओमिक्रॉनने मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या तीन रुग्णांपैकी एक नायजेरियामधून आला होता तर अन्य दोन त्याचे जवळचे होते. रुग्णलाय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार झालेला मृत्यू हा हृदयविकाराने
झाला होता . परंतु काल जेव्हा त्या रुग्णाचा जीनोम सीक्वेसिंगचा रिपोर्ट आल्यावर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.