अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- बाळाला जन्मानंतरच्या फक्त पहिल्या तीन वर्षांत उभे राहणे, चालणे, बोलणे असे खूप काही शिकायचे असते. त्याच्या या कृतींकडे लक्ष देणे पालकांची जबाबदारी असते.
बाळाच्या बोलण्याच्या विकासाचा क्रम असा असतो.
» ३ महिन्यांचे बाळ आवाज काढू लागते.
» ६ महिन्यांचे बाळ एकटे खूपशी अक्षरे बोलू लागते, उदा. मा, बा, पा इ.
» ९ महिन्यांचे बाळ दोनअक्षरी शब्द मोडके तोडके उच्चारू लागते. उदा. मामा, पापा, बाबा इ.
» दीड वर्षाचे होता होता बाळ दोन शब्द जोडून काही सार्थक शब्द बोलू लागते.
» दोन वर्षांचे बाळ ३ शब्दांची मोडकीतोडकी, पण सार्थक वाक्ये बोलू शकते. त्याचा शब्दकोष ३0-४0 ऐकीव शब्दांचा होऊ शकतो.
» तीन वर्षांपर्यंत बाळाचा शब्दकोष ६0 ते ७0 शब्दांपर्यंतचा असायला हवा.
बाळाला वयाच्या या टप्प्यांवर बोलण्यात काही समस्या येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. या समस्या अशा असू शकतात.
० आवाजाने न दचकणे : – आपण बोलल्यानंतर बाळ उत्तर वा प्रतिक्रिया देत नसेल वा विचित्र प्रतिक्रिया देत असेल व हे वारंवार होत असल्यास डॉक्टरांना सांगा. जर बाळ बोलत असूनही कोणत्याही प्रकारच्या आवाजाने दचकत नसेल वा कोणतीही प्रतिक्रिया देत नसेल वा बहुधा खुणांनी उत्तर देत असेल, तसेच त्याच्या जवळपास वस्तू पडल्यास ते तिकडे पाहात नसेल, तर ती बाळाची ऐकण्याची वा समजण्याची समस्या असू शकते.
उपचारांसोबतच बाळाच्या बदलत्या प्रतिक्रियांकडे बारकाईने लक्ष द्या.
० कसलीही प्रतिक्रिया न देणे : – जर बाळ बोलत असूनही प्रतिक्रिया देत नसेल बा सार्थक बोलत नसेल, विचित्रपणे बोलत असेल वा अनेकदा इशाऱ्यांनीच बोलत असेल तर हे बर्याच प्रमाणात ऑटिझमचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे बाळाच्या खोड्या मानून टाळू नयेत.
० बोलताना अडसवळत असेल तर : – हे खूप किरकोळही असू शकते वा गंभीरही. मुले उत्सुकतेमुळे भरभर बोलतात वा अडखळत बोलतात. कदाचित बाळात मेंदू संबंधित एखादी समस्या वा मेंदूच्या रिसेप्टिव्ह एरियात एखादी समस्या असू शकते.
कित्येकदा ही समस्या मेला ला लागलेल्या मारामुळे वा स्ट्रोकमुळे होऊ शकते. अशावेळी उपचाराला उशीर करू नये. उपचारा सोबत बोलण्याचा सराव करून घ्यावा. औषधांसोबत स्पीच थेरपिस्ट दिलेल्या सूचनांचे पालन करावे. याची सुरुवात कमीत कमी शब्दांनी करावी.
० चालताना संतुलन बिघडणे : – ज्या वयात मुले व्यवस्थित चालायला शिकायला हवीत, त्या वयात जर थोडीशी चालताच पडत असतील व तोल सावरू शकत नसतील तर याला बॅलन्स डिसऑर्डर म्हणतात. अर्थातच असे विकार ज्यामध्ये चक्कर येणे, अंधुक दृष्टी, धुसरपणा वा वारंवार पडण्याची समस्या असते.
बऱ्याचदा हे कानात एखादे व्हायरल वा बॅक्टेरियल इन्फेक्शन, डोक्याला मार, मेंदूतील एखादा त्रास यामुळे होते. अशावेळी विशेषज्ञ तपासून समस्येचे कारण व संतुलनाचा व्यायामही सांगतात. बाळाच्या विकासात कोणतीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.