अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून, राज्यातील अनेक व्यवसाय देखील आता काहीअंशी सुरळीत चालू झाले आहेत. एकीकडे असे आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र मागील काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.
यात पारनेर, संगमनेर या दोन तालुके कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट झाले आहेत. त्यामुळे येथील यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. त्या अनुषंगाने पारनेर तालुक्यात विविध नियम लागू करण्यात आले आहेत.
लग्न समारंभाबाबत देखील अनेक कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र अनेकजण हे नियम पळत नसल्याचे निदर्शनास आल्याने पारनेरच्या तहसीलदार जोती देवरे यांनी तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दीवर लक्ष केंद्रीत केले.
त्यानुसार काल तालुक्यात १३ विवाह व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जमा झालेल्या तब्बल साडे तीन हजार नागरिकांची चाचणी केली. या चाचणीत तब्बल ४३ जण कोरोना बाधित आढळले.
एखाद्या सोहळ्यात जमा झालेल्या नागरिकांची चाचणीचा हा पहिलाच प्रयोग असावा, तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेला बाधीतांचा आकडा नियंत्रित करण्यासाठी तहसीलदार देवरे
यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील सुमारे ७१ गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. त्यात रविवारी विवाहाची मोठी तारीख असल्याने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येवून संसर्ग वाढण्याची भीती होती.
त्यामुळे नियमाचा भंग केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. तसेच तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी कॅम्प प्रत्येक उपस्थिताची चाचणी केली. यात ४३ बाधित आढळून आले.