Indian Railways : काय सांगता! रेल्वेमधील पंखे कधीच चोरी होऊ शकत नाही, यामागचं तंत्रज्ञान जाणून व्हाल थक्क

Indian Railways : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेमध्ये अनेक चोरीच्या घटना घडतात. यामध्ये रेल्वेच्या मालमत्तेच्याही वस्तू चोरी होतात. पूर्वी रेल्वेमध्ये पंखे चोरीला जात होते.

परंतु, आता रेल्वेमधील पंखे चोरीला जात नाहीत.पंखे चोरीला जाऊ नये म्हणून रेल्वेने भन्नाट कल्पना आखली आहे. यामागचे तंत्रज्ञान जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

चोरीच्या अनेक घटनांनंतर रेल्वेने एका जबरदस्त तंत्राचा वापर केला आहे. हे पंखे फक्त रेल्वेमध्येच काम करतात. जर कोणी तो चोरून घरी चालू केला तर चालत नाही.

असे आहे तंत्रज्ञान

सामान्यतः घरांमध्ये वापरण्यात येणारी वीज दोन प्रकारची असते. पहिला पर्यायी करंट म्हणजेच एसी ज्याची कमाल शक्ती 220 व्होल्ट आहे. दुसरा डायरेक्ट करंट म्हणजेच DC ज्याची कमाल शक्ती पाच, 12 किंवा 24 इतकी असते.

रेल्वेमध्ये बसवलेले पंखे 110 DC वर चालतात. त्यामुळे जर कोणी हे पंख चोरून घरी नेले तरी चालत नाही.

दंडनीय गुन्हा

जर कोणी रेल्वेच्या कोणत्याही मालमत्तेची चोरी केली तर तो दंडनीय गुन्हा आहे. त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, जर आरोपी दोषी आढळला तर त्यावर 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्यावर दंड आकारला जाऊ शकतो.