अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अद्यापही अनेक भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना रुग्णाची बिलासाठी अडवणूक करू नका आशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र आजही अनेक ठिकाणी अवाच्यासव्वा बिले रुग्णांच्या माथी मारली जात आहेत. अनेकदा अडवणूक देखील केली जाते.
मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात अवघ्या ११ हजार रुपयांसाठी रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्रच घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील एकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यानच्या काळात मोठ्या भावाने त्याच्या भावाच्या उपचारासाठी पत्नीच्या कानातील दागिने गहान ठेवले होते.
खरंतर त्या दागिन्यांची किंमत जास्त होती. मात्र, वेळ वाईट असल्याने समोरच्याने फक्त २३ हजार दिले. रुग्णालयात भावाला आता डिस्चार्ज मिळणार होता.
रुग्णालय प्रशासनाने हिशोब केला. त्या हिशोबत आमच्याकडे११ हजार रुपये कमी पडत होते. तर रुग्णालय प्रशासनाने ११ हजार रुपये देत नाहीत, तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही.
अशी तंबी देखील या रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर रुग्णालय प्रशासनाने निर्लज्जपानाचा कळसच केला. पैशासाठी थेट रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्राचीच मागणी केली. नाईलाजाने ते रुग्णालय प्रशासनाला द्यावे लागले.