अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राज्यात सध्या काय चालले आहे हे कोणालाच समजत नाही. सरकार एकीकडे केवळ मोठमोठ्या घोषणा करत आहे. तर दुसरीकडे वेतन न मिळाल्याने उपासमार होत असल्याने संतप्त झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवर उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

कोरोना काळात कामगिरी न मिळाल्यामुळे वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे आज शेवगाव आगारामध्ये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव दिलीप लबडे व सेक्रेटरी राजेंद्र घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषण सुरू केले आहे.

यावेळी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

माहे जून जुलै महिन्यातील स्पेअर दिवसाच्या हजेरीच्या दिवसाची वेतन पुरवणी पगार पत्रिका मिळून वेतन अदा करण्यात यावे, वाहतूक नियंत्रक चक्री अलोकेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, ३१ ऑगस्ट रोजी शेवगाव पाथर्डी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे सर्वच मार्ग बंद झाले होते.

सदर दिवसांची हजरी आगारातील कामगारांना देण्यात यावी, मालवाहतूक भत्ता व आठवडा सुट्टीचा मोबदला ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा करण्यात यावे, कोरोना कालावधीत काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहनपर भत्ता तीनशे रुपये रोज प्रमाणे पेड इन सप्टेंबर च्या पगारात देण्यात यावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.