लॉकडाऊनबाबत काय निर्णय होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ .३० वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार असून यावेळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन वाढवणार असून निर्बंध थोड्या प्रमाणात शिथील केली जातील असे यापूर्वीच सांगितले होते.

कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री यासंबंधी अधिकृत माहिती देतील असंही ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ .३० वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लॉकडाउन वाढणार असला तरी तो किती दिवसांसाठी वाढणार आहे याबाबत स्पष्टता नाही. महाराष्ट्रात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथील केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच नेमके कोणते निर्बंध शिथील केले जाणार आहेत याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24