ताज्या बातम्या

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार

Published by
Renuka Pawar

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) यंदाचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) साजरा करण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा हा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर साजरा करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. महापालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे कार्यकर्त्याना सूचना देणार आहे.

राज ठाकरे यांचा ४ दिवसीय पुणे दौरा आहे. राज ठाकरे यांच्या सह अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील पक्षाच्या वर्धापन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका निवडणुकीमुळे जोरदार तयारी मनसेकडून करण्यात येत आहे. पक्षाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त पुण्यात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे मोठं मोठे बॅनर (Banner) लावण्यात आले आहेत.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मनसेचा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. लढायचं ते जिंकण्यासाठी हा मंत्र राज ठाकरे मनसे सैनिकांना देण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे संभाव्य भाजपसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे बोलतील. ओबीसी राजकीय आरक्षण, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar