मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह च्या (Pen drive) माध्यमातुन महाविकास आघाडीवर बॉम्ब टाकला आहे.
फडणवीसांच्या या व्हिडीओ (Video Bomb) बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) गायब असल्याचे बोलले जात आहे.
फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर प्रवीण चव्हाण हे माध्यमांशी बोलणं टाळत असल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता ते गायबच असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण (Pravin Chavan) यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिला आहे.
त्यानंतर राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे.
याबाबत काल प्रवीण चव्हाण यांनी आपला कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल.
मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली होती.