WhatsApp Features : वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Features : आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. या फीचर्समुळे व्हॉट्सॲप चॅट आणखी मजेदार होणार आहे. नुकतेच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती. 

अशातच पुन्हा एका व्हॉट्सॲप नवीन फीचर्स घेऊन येत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. वापरकर्ते या फीचर्सची मागणी अनेक दिवसांपासून करत होते.

अशाप्रकारे तपासा फीचर्स

या फीचरचा आनंद घेण्यासाठी यूजरला व्हॉट्सॲपवरील ॲप अकाउंटच्या सेटिंगमध्ये जाऊन तपासावे लागेल, जर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये हे फीचर मिळत नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाइलच्या आगामी अपडेटची प्रतीक्षा करावी लागेल.

कंपनीने नुकतेच हे फीचर निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी आणले आहे. एकदा त्याची बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे फीचर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

फोटो-व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स घेण्यास बंदी घालण्यात येईल

व्हॉट्सॲपच्या या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी होती. कंपनीचे हे फीचर युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयतेच्या दृष्टीने खूप खास असू शकते. हे फीचर सुरू झाल्यानंतर एकदा व्ह्यू मार्क करून पाठवलेले फोटो आणि व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही.

अशा प्रकारे अवतार स्टिकर्स बनवले जातात

या फीचरच्या वृत्तानुसार, हे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये येताच तुम्ही ते मोबाईलमध्ये कॉन्फिगर कराल. त्यानंतर अवतार फीचरचा पॅक व्हॉट्सॲपमध्ये आपोआप उपलब्ध होईल. यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करावे लागणार नाही. यानंतर, वापरकर्ते त्यांच्या संपर्कांना अवतार स्टिकर्स पाठवू शकतील.

तसेच तुम्ही व्हॉट्सॲपवर तुमचा प्रोफाइल फोटो म्हणून अवतार स्टिकर्स वापरू शकता. व्हॉट्सॲप सध्या आपल्या वापरकर्त्यांना व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग तसेच ऑडिओ व्हिडिओ आणि फोटो पाठविण्याची परवानगी देते. तसेच तुम्ही 24 तासांसाठी फोटो आणि व्हिडिओ स्टेटस म्हणून सेट करू शकता.