अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- काही खासगी कोविड सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केली जात असल्याने रुग्ण व नातेवाईंकाना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
ऐन कोरोना महामारीत प्रत्येकजण आर्थिक संकटात असताना अव्वाच्या सव्वा बील आकारणीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावावे,अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, प्रदेशाध्यक्ष सुरेश अडांगळे, सचिव हनिफ पठाण, जिल्हाध्यक्ष रजाक शेख, प्रदेश सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, जिल्हा युवाध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड, कार्याध्यक्ष समीर वीर,
जिल्हाअध्यक्ष मंजाबापू साळवे, राहुरी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र आल्हाट यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी शासकीय हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्ण व नातेवाईकाला वेळेत उपचार मिळत नसल्याने मोठया मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
हे सर्व चालू असताना काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिलाची मागणी होताना दिसत आहे.
राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी खासगी हॉस्पिटलने सरकारी दराप्रमाणे बिल आकारणी आकारून कोरोना रुग्णाला उपचार द्यावे, असे आदेश दिले असतानाही अव्वाच्या सव्वा बील आकरणी करतात.
तहसीलदाराचे आदेश जणू खासगी हॉस्पिटलने जुगारून लावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याबत कोरोना दक्षता समिती यांनी संबंधित हॉस्पिटलची पाहणी करणे आवश्यक आहे.
रुग्णाकडून उपचारासाठी घेणारी फी ही सीसीटीव्ही फुटेज मधूनच घेतली पाहिजे.
संबंधित हॉस्पिटलचे बिल बुक तपासून पैसे घेताना वेगळे पुस्तक तर शासनाला दाखविण्यासाठी वेगळे पुस्तक असे चित्र खासगी हॉस्पिटलमध्ये पहावयास मिळत आहे.