अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यातील हेड कन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने रात्रीच्या सुमारास कामावर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर मैत्री करण्याचा
दबाव आणून विनयभंग केल्याची तक्रार महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठून केल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
या पोलिस हेड कॉन्स्टेबलने रात्रपाळीत सेवेत कार्यरत असतानाच त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना घडली.
संबधित महिला कॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दाखल करण्यास जिल्हा पोलिस कार्यालय गाठले व आपल्यावरील अन्याय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कानावर घालून आपल्यावरील अन्यायाविरुद्ध मोकळी वाट करून तक्रार दाखल दिली.
त्यानुसार शनिवारी (५ जून) रात्री उशिरा आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याचेविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात संबधित महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळेस सेवेत कार्यरत असताना
महिला पोलिस कर्मचाऱ्यास ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याने तू माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून त्या महिला कर्मचाऱ्यांचा हात ओढून जवळ घेऊन मिठी मारली होती. या घटनेनंतर संबंधित पोलिस महिलेनी वरिष्ठांकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर आरोपी आघाव याने महिलेची लेखी माफी मागितली. यापुढे असे करणार नाही असे सांगून महिलेने बदलीची मागणी केली.
मात्र, पुन्हा आरोपीने महिलेची छेडछाड केल्याने महिला पोलिस कर्मचारी यांनी तातडीने नगर येथे जाऊन वरिष्ठ यांचेकडे तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.
त्याप्रमाणे शनिवारी रात्री आरोपी भाऊसाहेब आघाव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन खैरनार हे करत आहेत.