अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एटीएमचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडच्या काळात एटीएमद्वारे फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
तशा तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. यामुळे अहमदनगर सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना एटीएम वापरण्याबाबत काही सूचनांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहे.
सहा सूत्र आपण वापरले तर निश्चित आपली फसवणूक होऊ शकणार नाही, असे आव्हान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केले आहे.
यामध्ये एटीएममध्ये प्रवेश करताना दुसरी व्यक्ती आतमध्ये नसल्याची खात्री करावी, कार्ड मशीनमध्ये टाकण्याअगोदर एटीएमच्या स्लॉट तसेच किपॅड वर दुसरे आवरण तर नाही ना,
याची खात्री करावी, आपल्या एटीएमचा पिन नंबर सदर मशीनमध्ये टाकताना तो इतरांना दिसणार नाही याची काळजी घ्यावी, एटीएमचा पिन हा गोपनीय असल्याने तो कार्डवर लिहून ठेवू नये,
एटीएमद्वारे खरेदी करताना (हॉटेल/पेट्रोलपप/दुकान) पिन नंबर त्रयस्थ व्यक्तीस समजला असेल तर त्वरित पिन नंबर बदलावा, एटीएम गहाळ झाल्यास तात्काळ संबधित ग्राहक सेवा केंद्रास संपर्क साधून एटीएम ब्लॉक करावे, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.