कधी होणार अहमदनगर शहर खड्डेमुक्त ? शहराची ओळख खड्ड्यांमुळे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर शहराची ओळख खड्डेमय रस्त्यांमुळे झालेली आहे शहरात एक-दोन पाऊस झाले तर पूर्ण शहर हा खड्डेमय बनतो सत्ताधारी फक्त फोटोमध्ये

नगरकरांना विकास दाखवून आशेवर ठेवतात नगर शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम सोडून दिले

तर काही काम फक्त फोटो पुरते केले आहे अडीच वर्षांमध्ये शहरात एकही काम शहराला साजेल असे दिसून येत नाही ते फक्त फोटोमध्ये पाहायला मिळत असून महापालिका फक्त फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांना विकास दाखवून

गाजर दिल्यासारखं आहे शहरात आत्तापर्यंत कमी दाबाने पाऊस पडतो तरीपण शहर खड्डेमय झालं लॉकडाऊन काळात फेज टू साठी रस्ते खोदण्यात आले परंतु ते रस्ते तसेच ठेवण्यात आले

तख्तीदरवाजा मशीद ते जुने मनपा कार्यालय, कापड बाजार, घास गल्ली, माणिक चौक, नवी पेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड बेलदार गल्ली सर्जेपुरा सर्जेपुरा चौक ते बागड पट्टी असे अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडून दिले

तर काही ठिकाणी रस्त्यावर कच टाकली असून येण्या-जाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीत महानगरपालिका विकास सोडून फक्त कोरोणाच्या नावाने बोंबलत आहे तसेच दर ८ दिवसाला पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटत आहे

संपूर्ण मनपा प्रशासनाचा बोजवारा उडालेला आहे. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे संपूर्ण शहर खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होतात नागरिकांचा नाहक बळी जातो तरीही प्रशासन ठप्प आहे आता तर पावसाला सुरुवात झाली आहे

शहरात अनेक ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात झाली असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबर ही निघालेले आहे

विशेष म्हणजे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दरवेळेस करण्यात येते आणि प्रत्येक वेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात डांबर उखडून खड्डे निर्माण होतात वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे

त्यांना आपला जीव धोक्यात घालून नगर शहराच्या रस्त्यांवरून जावे लागत असल्याची भावना अजीम राजे यांनी व्यक्त केली आहे

व लवकरात लवकर अहमदनगर शहर हे खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे व अहमदनगर शहराची ओळख खड्डेमुक्त बदलण्याची मागणी अजीम राजे यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24