दोन टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना पोलिसांकडून अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा एक साथीदार शेख अब्दूल रऊफ (रा. मोमीन गल्ली, भिंगार) हा पसार झाला आहे.

त्यांच्याकडून हिरा गुटखा, रॉयल 717 तंबाखू व दोन टेम्पो असा 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर-दौंड रोडवरील अरणगाव (ता. नगर) चौक येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख नासिर अहमद चाँदमिया (वय 44 रा. गाडेकर गल्ली, भिंगार), शेख अय्याज नसीर (वय 39 रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख (वय 34 रा. नागरदेवळे ता. नगर),

सय्यद आसीफ महेमूद (वय 42 रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण (वय 48 रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काही इसम दोन टेम्पोमधून नगर-दौंड रोडने नगर शहरात गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने अरणगाव चौक येथे सापळा लावला. दोन्ही टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये हिरा गुटखा व रॉयल 717 तंबाखू मिळून आली. पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे. टेम्पोसह गुटखा वाहतूक करणार्‍या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

Ahmednagarlive24 Office