रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशानाची होतेय तारेवरची कसरत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सध्या जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.रोज हजारोंच्या संखेने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा व मागणी याचा मेळ घालताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.

मात्र, आहे त्या परिस्थितीला प्रशानाल तोंड देत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा वेगाने वाढीस लागली. या परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत होत्या.

मात्र, दररोज वाढणारा बाधितांचा आकडा आणि उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या कमी पुरवठा यामुळे नवे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे. या संकटाच्या प्रसंगीही काहींनी नामी संधी मानली.

बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीत रेमडेसिविर असल्याने बाधितांच्या नातेवाईकांची या इंजेक्शनची शोधमोहीम करण्यासाठी पायपीट सुरू झाली. मात्र, सध्या या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत आहे.

या परिस्थितीत होणाऱ्या काळ्या बाजाराची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासाठी थेट निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांची नियुक्ती केली आहे. मात्र, गरज चार हजाराची आणि पुरवठा हजार,

बाराशे असा कमी असल्याने इंजेक्शनची टंचाई कमी होण्याचे नाव घेत नाही. हीच परिस्थिती ऑक्सिजनच्या बाबतीतही प्रकर्षाने आढळून येत आहे. जिह्यात सध्या उपचार सुरू असणारी कोरोनासंख्या जवळपास १२ हजार आहे.

यापैकी काही रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने १ एप्रिलच्या आदेशातच उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा वापर करणे बंद केले आहे.

सध्या बाधितांवर उपचार करण्यासाठी असलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याची उपलब्ध मात्रा याचे प्रमाण व्यस्त आहे. या प्रमाणाचा मेळ घालण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

पुणे जिह्यातील चाकण, फुरसुंगी येथील ऑक्सिजन उत्पादकांच्या सोबत त्यांच्या अधिकृत डीलरमार्फत प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

तसेच, रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठीदेखील प्रशासनातील अधिकाऱ्यांची फोनाफोनी सुरू आहे. दैनंदिन उपाययोजना करतानाच इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मेळ घालण्याची कसरत प्रशासनाला सध्या करावी लागत आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24