ताज्या बातम्या

राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळाली. त्यातच शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र, संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार होती.

मात्र महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे निकालाला मध्यरात्री उजाडली. मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपनं घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचं मत बाद ठरवण्यात आलं. तर उर्वरित २८४ मतं वैध ठरवण्यात आली.

राज्यसभा निवडणुकांचा निकाल अखेरीस लागला आहे. यात अपेक्षेप्रमाणे मविआचे तीन आणि भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१ मते मिळाली आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची ४३ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची ४४ मते मिळाली आहेत. भाजपाच्या पियुष गोयल यांना ४८ तर अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते तर महाडिक यांना पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली आहे.

पहिल्या पाच जागांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच

भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

या निवडणुकीत भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

सहाव्या जागेवर महाडिक विजयी, पवारांचा पराभव

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली होती.

कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Ahmednagarlive24 Office