आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे संजय सिंग नेमके आहे तरी कोण? जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-  क्रूझ ड्रग पार्टी आणि आर्यन खान अटकेप्रकरणात वादग्रस्त ठरलेले एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना आर्यन खान प्रकरणातून हटवले आहे.

वानखेडे यांच्या जागी आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंग आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत. ओडिशा केडरचे IPS संजय सिंह यांची NCB (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) चे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी समीर वानखेडे यांनी सांगितले की, “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही.

या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी मी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे.”

नेमके कोण आहेत संजय सिंग? जाणून घ्या त्यांच्याविषयी संजय हे 1996 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा ओडिसाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही पाहिले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली एनसीबी कार्यालयात बदली झाली होती.

सिंग यांनी ओडिशा राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ओडिसामध्ये पोलिस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्स (डीटीएफ) चे प्रमुख असताना सिंग यांनी राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली होती.

त्यानंतर संजय सिंग यांना सरकारने बढती देत दिल्ली कार्यालयात बदली केली होती. त्यांनी ओडिसामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते.

एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.

Ahmednagarlive24 Office