वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू झालेली असताना ही बैठक होत आहे. त्यामुळे येथील उपस्थितीकडे लक्ष लागलेले आहे. या बैठकीला गजानन कीर्तिकर अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर व राजेंद्र गावीत हे खासदार उपस्थित आहेत.

तर भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने व कलाबेन डेलकर हे खासदार गैरहजर आहेत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील काही खासदारांची मागणी आहे. आता खासदारांते म्हणणे ऐकून घेऊन, त्यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.