ताज्या बातम्या

JM Joshi Gutka Business Story : प्रत्येक महिन्याला अंडरवर्ल्डमधून पैसे घेणारी ती अभिनेत्री कोण? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Published by
Ahmednagarlive24 Office

JM Joshi Gutka Business Story : आता सगळ्यांना एक धक्का देणारी बातमी आहे. कारण अंडरवर्ल्डमधून दर महिन्याला एक अभिनेत्री पैसे घेत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

दरम्यान याप्रकरणी अनेक नावे समोर आली आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे याची सुरुवात कुठे आणि कशी झाली ते जाणून घेऊयात सविस्तर..

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी प्रसिद्ध चित्रपट अभिनेता संजय दत्तला अटक करणारे निवृत्त एसीपी सुरेश वॅलिशेट्टी यांनीही गुटखा प्रकरणाचा तपास केला होता. त्यावेळी त्यांनी जंबोची सखोल चौकशी केली होती. दाऊदचा भाऊ अनीस याच्या सांगण्यावरून जंबो प्रत्येक महिन्याला एका बॉलिवूड अभिनेत्रीला ठराविक रक्कम पाठवत असे वॅलिशेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान या अभिनेत्रीचे मुंबईत एक बुटीक शॉप होते. गुटखा प्रकरणी त्या अभिनेत्रीचे कोणतेही कनेक्शन नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने या अभिनेत्रीची कोणतीही चौकशी केली नाही. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.

दरम्यान जंबोला 27 सप्टेंबर 2004 रोजी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली. अटकेनंतर झालेल्या चौकशीत तो अंडरवर्ल्ड, डी कंपनी आणि बॉलिवूड अभिनेत्रींबाबत अनेक गुपिते उघड करत होता.

जंबो दाऊदचा भाऊ अनीसशी 1992 पासून संबंधित असल्याचे वालिशेट्टी यांचे मत आहे. त्यानंतर अनीस दुबईत राहत होता. अशातच जंबोही अनीसच्या घरी राहत होता. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर डी कंपनीचे अनेकजण पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. त्यानंतर जंबो नियमितपणे पाकिस्तानला जाऊन अनीसच्या ‘क्लिफ्टन’ या बंगल्यात राहू लागला.

दरम्यान 2000 मध्ये अनीसचा मुलगा मेहरानच्या वाढदिवसाच्या पार्टीची संपूर्ण व्यवस्था जंबोने केली होती. 2001 मध्ये अनीसच्या मुलीच्या लग्नासाठी ते पत्नी नाजनीनसोबत पाकिस्तानमध्ये गेले होते. अनीस 1993 नंतरही अनेकदा दुबईत येत असल्याचे जंबोच्या चौकशीदरम्यान समोर आले आहे.

1999 मध्ये माणिकचंद गुटख्याचे मालक रसिकलाल धारिवाल आणि गोवा गुटख्याचे मालक जेएम जोशी यांच्यात व्यवसाय आणि मोठ्या रकमेवरून वाद सुरू झाला असल्याचे जंबोने मुंबई गुन्हे शाखेला सांगितले होते. त्यानंतर जोशीने 2000 मध्ये अनीसला भेटण्यासाठी दुबईला जाऊन पैसे वसूल करण्यासाठी धारीवाल यांची मदत घेतल्याचा आरोप केला आहे. यानंतर अनीसने धारिवाल यांना दुबईला बोलावले होते.

त्यावेळी तेथे जंबो उपस्थित होता. हे सगळेजण दुबईहून कराचीला गेले, जिथे दाऊदने मध्यस्थाची भूमिका बजावली. त्यांनी धारिवाल यांना जेएम जोशी यांना एकूण ११ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. याच्या बदल्यात दाऊदचा भाऊ अनीस याला खूश करण्यासाठी जेएम जोशी यांनी पाकिस्तानमध्ये एक गुटख्याची फॅक्टरी उघडली असल्याचा आरोप आहे. त्या फॅक्टरीला ‘फायर गुटखा’ असे नाव दिले आहे.

2002 मध्ये अनीसला पाच गुटखा फिलिंग आणि पाऊच पॅकिंग मशीनची गरज भासली होती. त्यावेळी त्याने मुंबईतील एका व्यक्तीला बोलावून मशीन दुबईला पाठवण्यास सांगितली. अनीसच्या सांगण्यावरून या व्यक्तीने ही मशिन मुंबईत मिळवून जम्बोच्यामार्फत दुबईला पाठवली.

त्यांनतर फारुख मन्सुरी याने दुबईहून पाकिस्तानात ही मशीन पोहोचवली होती. फारुख मन्सूरी यांचा मुंबईतील प्रसिद्ध जेजे गोळीबारात सहभाग असल्याचे मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात समोर आले आहे. तसेच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

अनीसच्या पाकिस्तानातील फायर गुटखा कंपनीत मुंबईतील एका व्यक्तीची भागीदारी असल्याचेही मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासात समोर आले आहे. त्या व्यक्तीला अनीसने त्याला जुलै 2004 मध्ये गुटखा मशीनचे सुटे भाग पाठवण्यासाठी फॅक्सही केला होता.

या प्रकरणात राजेश पंचारिया नावाच्या व्यावसायिकालाही आरोपी केले होते, परंतु न्यायालयाने 2018 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. जे.एम.जोशी यांनीही आजारी असल्याने डिस्चार्जसाठी अर्ज केला होता.

परंतु, न्यायालयाने मागणी मान्य केली नाही आणि न्यायालयाने तो अर्ज पाच वर्षांपूर्वी फेटाळला होता. रसिकलाल धारीवाल यांनाही आरोपी केले होते. त्यांचे दीर्घ आजाराने 2017 मध्ये निधन झाले.

Ahmednagarlive24 Office