Eknath Shinde : फ्रिजच काय कंटनेर भरून भरून खोके कुणाकडे गेले? हे खोके कुणी पचवले? शिंदेंचा कोणाला इशारा?

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकमेकांवर टीका करण्यावरून चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसकडून राज्यातील सरकारचा खोके सरकार म्हणून सतत उल्लेख केला जातो.

त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यावरूनही विरोधकांनी शिंदे गटाची चांगलीच कोंडी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी तर कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार असे म्हणत शिंदे गटाला चिमटा काढला आहे.

गुवाहाटीत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खोके तर ही छोटीमोठी गोष्ट आहे. फ्रिजच काय कंटनेर भरून भरून खोके कुणाकडे गेले? हे खोके कुणी पचवले? त्याचा शोध मी घेत आहे.

हे सर्व मी एक दिवस बाहेर काढणार आहे,असा सज्जड इशारा एकनाथ शिंदे यांनी नक्की कोणाला दिला यावर आता चर्चा होताना दिसत आहे. तसेच त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी जे करतो ते खुले आम करतो. लपूनछपून करत नाही. काही लोक लपूनछपून करतात. परंतु, लपूनछपून केलेली कामे उजेडात येतात. ती माहीत पडतात. काल दीपक केसरकर यांनी एक विधान केलंय. ते बोध घेण्यासारखं आहे.

आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:मध्ये झाकून पाहा. तुमचे बोलणे कुणाला लागू पडते ते कळून जाईल, असा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे.

राज्य सरकार आणि विधकांमध्ये खोक्यांवरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक सतत शिंदे सरकारला खो सरकार म्हणून डिवचत असते. त्यावरूनच एकनाथ शिंदे आक्रमक होत इशारा देताना पाहायला मिळाले.

शिंदे म्हणाले, फ्रिजमध्ये भरून खोके कुठे गेले? त्याचा मी शोध घेतो आणि नंतर बोलतो. सर्व दुनियेला माहीत आहे. महाराष्ट्राला माहीत आहे. ते बोलतात ते छोटेमोठे खोके आहेत. मोठमोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का?

मोठ मोठे खोके, फ्रिजभरून खोके, कंटेनर एवढे खोके कुणाकडे जाऊ शकतात? हे खोके कोण पचवू शकते? हे महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस ते महाराष्ट्राच्या समोर येईल. केसरकरांनी त्याचं सूचक विधान केलं आहे, असा इशाराही शिंदेनी दिला आहे.