Indian Railways : सुरूवातीला आणि शेवटीच का बसवले जातात जनरल डबे, जाणून घ्या यामागचे कारण..

Published by
Ahmednagarlive24 Office

Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे तिकीट खूप कमी असते. त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते.

तसेच प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने अनके नियम खूप कडक केले आहेत. याची काही प्रवाशांना माहित नसते. जर चुकून हे नियम मोडले तर त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. तुम्ही अनेकदा सुरुवातीला किंवा शेवटी जनरल डबे पाहिले असतील.

प्रवास करत असताना तुमच्या असे लक्षात आले असेल की, इंजिननंतर फक्त सुरुवातीला आणि शेवटच्या बाजूला जनरल डबे बसवले असतात. रेल्वेच्या मध्यभागी एसी आणि स्लीपर कोच असतात. त्यामुळे अनेकांना असे डबे का बसवले जातात असा प्रश्न पडतो.

याबाबत भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेता रेल्वेचे डबे या पद्धतीने लावलेले असतात.

जर रेल्वेच्या मध्यभागी जनरल डबे लावले तर संपूर्ण रेल्वेची व्यवस्था बिघडते. तसेच बोर्ड आणि डिबोर्डशी निगडित खूप समस्या येण्याची शक्यता असते.

तसेच गाड्यांची आसनव्यवस्था आणि इतर व्यवस्थाही बिघडते. रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटच्या टप्प्यात जनरल डबे असणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर असते. जनरल डब्यांमध्ये बसलेली गर्दी लांब पल्ल्याच्या दोन ठिकाणी विभागण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत लवकर बाहेर पडता येते.

Ahmednagarlive24 Office