आमचा टेम्पो का पकडला?  तुमचे हातपाय तोडून टाकू?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- वाळू तस्करांकडून अनेकदा महसूलच्या अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

नुकतेच अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडल्याच्या कारणावरुन तलाठ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करुन हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील चिंचबन शिवारात घडली असून याबाबत फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खुपटी येथील कामगार तलाठी गणेश आप्पासाहेब घुमरे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि.१० ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिंचबन ते नेवासा रोडवर असलेल्या गणेश शिंदे यांचे वस्तीजवळ दत्तात्रय आसाराम हिवरे (रा.नेवासा खुर्द)

व त्याचे दोन अनोळखी साथीदार व टेम्पो चालक (नाव गाव माहित नाही) यांनी त्यांचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का पकडला? या कारणावरुन मला व माझे सोबत असणारे कोतवाल बाळासाहेब सुखदेव चौधरी असे आम्हास शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत तुमचे आम्ही आता हातपाय तोडून टाकू अशी धमकी देवून पकडलेला विनानंबरचा आयशर टेम्पो यामध्ये दोन ब्रास वाळूसह चोरी  करुन घेवून पळून गेले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24