Trains Run Faster at Night : दिवसापेक्षा रात्री वेगाने का धावतात रेल्वे? जाणून घ्या रंजक कारण…

Trains Run Faster at Night : तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील. मात्र तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का दिवसापेक्षा रात्री रेल्वे कधीही वेगाने धावत असते? यामागेही एक कारण आहे जे तुम्हाला माहिती नसेल.

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे. भारतीय रेल्वेद्वारे दररोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हीही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. दिवसा पेक्षा रात्री ट्रेनचा वेग अधिक वाढण्याचे कारण काय आहे? जर तुम्हाला याचे उत्तर माहित नसेल तर आज तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

यामुळे रेल्वे रात्री वेगाने धावते

वास्तविक, रात्रीच्या वेळी ट्रेनचा वेग अनेक कारणांमुळे वाढतो. याचे पहिले कारण म्हणजे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवर माणसांची आणि प्राण्यांची हालचाल कमी होते. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने रात्रीच्या वेळी रेल्वे जास्त वेगाने धावते.

रात्रीच्या वेळी लांबून सिग्नल दिसतात

याशिवाय, हे देखील एक कारण आहे की ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजेच लोको पायलट रात्रीच्या वेळी दुरून सिग्नल पाहू शकतो, ज्यामुळे लोको पायलटला बर्‍याचदा ट्रेनचा वेग कमी करण्याची आवश्यकता देखील नसते. त्यामुळे रात्री ट्रेन वेगाने धावते.