7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार का नाही? जाणून घ्या सरकार कधी निर्णय घेणार……

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission: अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सणापूर्वी महागाई भत्ता (dearness allowance) वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employees) अद्यापही महागाई भत्त्याच्या (डीए वाढ) प्रतीक्षेत आहेत.

असे म्हटले जात आहे की, सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, आठवा वेतन आयोग (Eighth Pay Commission) तूर्तास येणार नसल्याचे सरकारने निश्चितपणे स्पष्ट केले आहे.

मार्चमध्ये डीए वाढवण्यात आला होता –

सरकार (government) दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल करते. मागच्या वेळी सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए दिला जात आहे.

बदल दर सहा महिन्यांनी होतो –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवू शकते. पण हे कधी होणार, यावर सरकारने काहीही सांगितलेले नाही. कारण मार्चमध्ये डीए वाढवून सहा महिने पूर्ण होणार आहेत.

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले होते की, औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (All India Consumer Price Index) आधारावर महागाई दर मोजला जातो. या आधारावर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलला जातो.

पगार किती वाढणार? –

गणनेनुसार, सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला तर पगारात मोठी वाढ होईल. सध्या एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास. 34 टक्के दराने, महागाई भत्ता 6,120 रुपये होतो. चार टक्क्यांनी वाढ झाल्यास डीए 6,840 रुपये होईल.

अद्याप कोणतेही अधिकृत विधान नाही –

सध्याचे महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केल्यास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए सरकार कधी वाढवणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबरमध्ये डीए वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.