हीच का अवैध वाळू उपशावरील मोठी कारवाई ? बैलगाडी केली जप्त, ट्रक व ट्रॅक्टरवर दुर्लक्ष !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील मुळा नदीपात्रातील ट्रक, ट्रॅक्टर द्वारा बेकायदा वाळू उपसा अहोरात्र चालू आहे. म्हणून आपण बैल गाडीभर वाळू उपसा केला, तर काय बिघडला, असा विचार करत त्याने आज बैलगाडीत वाळू भरायला सुरुवात केली.

खरी पण कार्यक्षम महसूल यंत्रणेने लगेचच ही वाळूचोरी पकडली. पप्पू शिंदे, तांदूळवाडी याची बैलगाडी वाळूसह जप्त केली. गुरुवारी दुपारी बैलगाडीवर महसूल विभागाने तातडीने केलेली ही कारवाई हा मोठा चर्चेचा विषय झाला होता.

लहान मासे गळाला लावण्यासाठी शक्ती पणाला लावणारी यंत्रणा मोठे मासे गळाला लावताना कुठे गेले असता, असा सवाल उपस्थित होत आहे. अशीच कारवाई मोठ्या मासांवर केली गेली तर खरोखरच अवैध वाळूउपसा थांबू शकेल.

पप्पू शिंदे याची बैलगाडी मंडळ अधिकारी बी. के. मंडलिक यांनी जप्त केली. जप्त केलेली बैलगाडी राहुरी तहसील कचेरी आवारात आणण्यासाठी बरेच दिव्य करावे लागले. तलाठी रवींद्र बाचकर यांनी तिचा पंचनामा केला वाळू जप्त केली.

बैलगाडी वाळूसह तहसीलचे देताना एक मोठे आव्हान होते. छोटा हत्तीला जोडून बैलगाडी कचेरीच्या आवारात आणण्यात आली. अवैध वाळू उपशावरील ही अवैध कारवाई पाहण्यासाठी बघ्याची गर्दी जमा झाली होती.

अहमदनगर लाईव्ह 24