अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागपूर मध्ये भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले.
यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला सध्या तो सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर जवळील नाल्यात मारेक-यांनी धारदार शस्त्रांनी वार करत योगेशची हत्या केली.
आरोपींनी हे कृत्य करून तेथून पळ काढला. गंगाबाईट घाट शेजारील नाल्यात उतरून आरोपींनी सपासप वार करत योगेशची हत्या केली. मनाचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडले.
यातील मृताचे नाव योगेश आनंद डोंगरे ऊर्फ धोंगडे (वय ३२) आणि आरोपींची नावे सुनील ऊर्फ गोलू अरुण धोटे (वय २६), हर्ष उमाळे (वय ३३) आणि कांचा ऊर्फ ऋषिकेश धुर्वे आहे. मृत योगेश तसेच आरोपी शिवाजीनगरात राहतात.
आरोपीने योगेशला बोलण्यासाठी नाग नाल्याजवळ बोलावलं होतं. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की गोलूने त्याला नाल्यात उतरवत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. विशेष म्हणजे अनेक जण हा प्रकार बघत राहिले होते.
त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.दोन मारेकरी आणि महिलाही यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळता आली.
दरम्यान या हत्यांकांडानंतर शिवाजी नगर परिसरात खळबळ उडाली. कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत. दुपारी 12 च्या सुमारास योगेशवर हा हल्ला झाला. शिवाजीनगर परिसरात रहात असलेला योगेश घरी असताना गोलू त्याच्या घराजवळ आला.
तिथे योगेश आणि गोलू यांच्यात वाद झाला.त्यानंतर योगेश घरालगत असलेल्या नाल्याजवळ गेला असताना गोलूनं त्याला नाल्यात पाडले. गंगाबाई घाटाशेजारील नाल्यात योगेशवर गोलूनं धारदार शस्त्रानं वार सुरु केले.
यावेळी योगेशला मारू नका अशी याचनाही काही जण करत असल्याचं व्हीडिओमधील आवाजात ऐकू येतंय. मात्र डोक्यात सैतान स्वार असलेल्या गोलूनं नाल्यात योगेशला पाडत त्याच्यावर वार सुरुच ठेवले. गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालाय दाखल केले .
मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.त्यानंतर गोलू फरार झाला. मात्र त्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या हत्येच्या घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल झाला.
योगेश आणि गोलू हे दोघेही मित्र असून एकाच परिसरात रहात होते. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.