अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-वारंवार समजूत घालूनही पत्नीने तिचे परपुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध बंद केले नाहीत. उलट तिने प्रियकराच्या मदतीने पतीलाच अनैतिक संबंधाच्या आड आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
अखेर हतबल पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.
मृत तरुणाच्या भावाने आष्टी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आष्टी तालुक्यातील वाहनचालकाच्या पत्नीचे भावकीतील तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत.
याबाबत पतीने त्याच्या भावाला सांगून पत्नीची समजूत घालण्यास सांगितलेे. त्यामुळे शनिवारी (दि.२०) भावाने पत्नीसह पुण्याहून येत भावजयीला व तिच्या प्रियकराला बोलावून घेतले आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
या वेळी त्या पतीनेही पत्नीच्या प्रियकराला तिला फोन करू नको किंवा भेटू नकोस असे सांगितले. परंतु, त्या दोघांनीही त्यास नकार दिला.
उलट तूच आमच्या प्रेमाच्या आड आलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी पतीला धमकी देत शिवीगाळ केली.
त्यानंतर प्रियकरापाठोपाठ पत्नी घरातून निघून गेली. अखेर पतीने बुधवारी (दि.२४) दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. दाेघांवर गुन्हा नोंद केला आहे.
वाढून 4.62 लाख कोटी रुपयांवर जाईल.