Ahmednagar News : छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या ! पती व सासूला झाली अशी शिक्षा, घडली जन्माची अद्दल….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. राजकुमार रामदास भगत व सरुबाई उर्फ सरस्वती रामदास भगत (दोघे रा. ढोकराई,ता.श्रीगोंदा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. २) मुजीब एस. शेख यांनी या खटल्याचा निकाल दिला. वेगवेगळ्या कलमान्वये आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भादवि कलम ३०४ (ब) अन्वये दोषी धरुन १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आल आहे.

सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्‍त सरकारी अभियोक्ता सौ. संगिता ढगे यांनी काम पाहिले. खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, फिर्यादीची मोठी बहिण सुदेशना हिचा विवाह राजकुमार भगत यांच्याबरोबर १० डिसेंबर २०१० रोजी झाला होता.

लग्नानंतर ५-६ महिने सुदेशना हिला चांगल्या पद्धतीने सासरच्या मंडळींनी नांदवले. नंतर वेगवेगळ्या कारणास्तव सुदेशना हिला सासरची मंडळी त्रास देवू लागली. शारीरिक व मानसिक छळ त्यांनी केला.

ती गरोदर असताना नवरा, सासू-सासरे आणि नणंद यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच कपाशीवर मारण्याचे औषध पाजण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिचा गर्भपात झाला होता. या घटनेनंतर तिला माहेरी सोडून दिले.

नांदायचे असेल तर २ लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. मध्यस्थींच्या सांगण्यानुसार सुदेशना पुन्हा नांदायला आली. सुदेशना हिला १ ऑक्टोबर २०१९३ रोजी मुलगी झाली. दरम्यान, १२ नोव्हेंबर २०१४ रोजी सुदेशना हिचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध फिर्याद देण्यात आली होती. मयताने तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले.

सरकार पक्षाच्यावतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यामध्ये फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, पंच, रेल्वेचा लोको पायलट, हस्ताक्षर तज्ज्ञ, मयताची मैत्रिण तसेच इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.