अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- शिवसेनेच्या युवा आघाडीचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याऐवजी आता त्याचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे दिले जात असल्याची चर्चा आहे.
या निमित्ताने ठाकरे घराण्याकडून महत्वाचे पद पहिल्यांदाच बिगर ठाकरे आडनावाच्या व्यक्तीला दिले जाणार असल्याने नवा इतिहास पुन्हा घडणार असल्याचे सांगण्यात येत अहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संसदीय लोकशाहीतील निवडणुका आणि पदे यापासून स्वत:ला मुक्त ठेवले होते.
मात्र सध्या ठाकरे यांच्या घरात मुख्यमंत्री आणि मंत्रीपद एकाचवेळी स्विकारून उध्दव आणि आदित्य ठाकरे यांनी नवा इतिहास रचला आहे. त्याच धर्तीवर आता युवासेनेचे प्रमुखपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरु केले असून संघटनेच्या वाढीसाठी ते सक्रीय झाले आहेत.
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या मतांची फौज शिवसेनेच्या मागे उभी करणे आवश्यक असुण आरक्षण, नोकरी, रोजगाराच्या समस्यांमुळे सध्या तरूणांमध्ये नाराजी आणि नैराश्याची भावना आहे.
त्यामुळे युवासेनेकडून सध्याच्या सरकारच्या माध्यमांतून तरूणांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करताना स्वतंत्रपणे युवा नेत्याची गरज आहे