Twitter : मिळणार भन्नाट फीचर! अपलोड करता येणार 60 मिनिटांचा व्हिडिओ, असणार ‘ही’ अट

Twitter : काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला आहे. तेव्हापासून त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम त्यांनी ब्लू टिकला सर्वीस चार्ज लावण्याचा मोठा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच त्यांनी आता आणखी एक जबरदस्त फीचर लाँच केले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येईल. परंतु, त्यासाठीही एक अट आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

क्रिएटर्सना मिळणार नवीन सुविधा

ट्विटरचे हे नवीन फीचर क्रिएटर्सना डोळ्यासमोर ठेवून जारी केले आहे. वापरकर्त्यांना आता 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. ट्विटर ब्लू वापरकर्ते आणि व्हिडिओ क्रिएटर्सना आता 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येतील. या वापरकर्त्यांना आता 1080p रिझोल्यूशन आणि 2GB पर्यंत फाइल अपलोड करता येतील अशी घोषणा ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी केली आहे.

परंतु, हे लक्षात ठेवा की वापरकर्त्यांना 60 मिनिटांचा व्हिडिओ फक्त वेबवर अपलोड करता येणार आहे. ट्विटरवर याअगोदर फक्त 512 एमबी आकाराचे आणि 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 10 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करता येत होते.

सर्व वापरकर्त्यांना वापरता येणार नाही फीचर

हे फीचर केवळ ब्लू युजर्सना वापरता येईल. कंपनीने अगोदरच या युजर्ससाठी या सुविधा मिळणार असल्याचे सांगितले होते. थोडक्यात हे फीचर पेड ब्लू सर्व्हिस म्हणून सादर केले आहे.

व्ह्यू काउंट फीचर

दरम्यान मस्क यांनी या आठवड्यात ट्विटर व्ह्यू काउंट फीचर आणले आहे. यामुळे तुम्हाला तुमचे ट्विट किती वेळा पाहिले, लाईक्स, कमेंट्स आणि रिट्विट्सदिसेल. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्सना वापरता येईल.