नामदेव राऊत यांचा ‘या’ पक्षात प्रवेश होणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपने आपल्याला विविध पदावर काम करण्याची संधी दिली होती. ती आपण आपल्या योग्य कौशल्याने यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी काम करताना अनेक पदाधिकारी यांची मोलाची साथ लाभली.

मात्र आज आपण आपल्या भाजपच्या प्राथमिक व सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठवला असल्याचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्या विकासकामाने आपण प्रभावित असून आगामी काळात त्यांच्या सोबत काम करण्याची मानसिकता असल्याचे जाहीर केले.

यासह आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या बरोबर काम करण्याची तयारी दर्शवून स्तुती सुमने उधळली.असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार का यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

अनेक दिवसांपासून कर्जतच्या राजकीय क्षेत्रात भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून ते लवकरच पक्ष प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा झडत होती.

त्यास शनिवारी, १८ रोजी स्वतः नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. नामदेव राऊत म्हणाले, भाजपच्या विचारधारेप्रमाणे अनेक वर्षे आपण विविध पदावर पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आपल्या कौशल्याने सर्व जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. या काळात अनेक राजकीय मित्र मिळाले.

त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. या सर्व काळात माजीमंत्री राम शिंदे यांच्या विकासकामात आपण त्यांचे सहकारी असल्याचे समाधान मिळाले.

यासह खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यासह स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री खासदार दिलीप गांधी, अॅड. अभय आगरकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. आपल्या राजकीय काळात सर्वच स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले ते न विसरणारे असल्याचे स्पष्ट केले.

मात्र आज आपण आपल्या भाजपच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. आपण भाजप पक्षाचा राजीनामा दिला हे मी कोणावर नाराज आहे. किंवा पक्षात कोणाचा त्रास आहे म्हणून नाही दिला आहे.

भविष्यात मला माझ्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, असे नामदेव राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यात आणखी उलथापालथ होणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.